शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

आलास तु..... बर झाले..... बरसलास तु...... मस्त वाटले......

आलास तु.....

बर झाले.....

बरसलास तु......

मस्त वाटले......

       उशीरा का होईना...

            तु जागलास.....

शेवटी माझ्या शेतकर्या साठी.....

  पावसा तुच रे धावलास....

         बरेच दिवे विझले.....

        तुझी वाट बघता बघता....

अश्रुही आटुन गेलेत आमचे.....

तुझ्यासीठी रडता रडता.....

               कर्जाने हेरपळले.....

            सरकारने डावलले......

नानानी आणी मकरंद नी सावरले....

तुझ्या येण्यानेच मात्र हे बहरले....

  आलाच आहेस आता तर......

           परत नको जाऊस....

  पुन्हा नको म्हणायला लाऊस....

  कि यावर्षी कमी पडला पाऊस....

            तु बदनाम झालेला.....

   मला कधीच नाही चालणार.....

      तुझ्याशिवाय आम्हाला.....

               कोण रे तारनार.......

बरसत रहा तु असाच.....

   फुलव आमच माळराण.....

     तुच वाचवशील रे आता.....

    माझ्या बळी राजाचे प्राण.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc