बुधवार, ३० सप्टेंबर, २०१५
मंगळवार, २९ सप्टेंबर, २०१५
कपडे झाले छोटे, 🙈 लाज कुठुन येणार,
कपडे झाले छोटे,
🙈 लाज कुठुन येणार,
धान्य झाले हाईब्रेड,
ताकद कुठुन येणार,
फुल झाली प्लास्टिकची,
सुगंध कुठून येणार,
चेहरा झाला मेक अपचा,
रुप कुठून येणार,
शिक्षक झाले टुयशनचे,
📚 विद्या कुठुन येणार,
भोजन झाले हाँटेलचे,
तंदुरुस्ती कुठून येणार,
प्रोग्राम झाले केबलचे,
😇 संस्कार कुठून येणार,
माणसे झाली पैशाची,
दया कुठुन येणार,
धंदे झाले हायफाय,
बरकत कुठुन येणार,
मित्र झाले वॉट्सअपचे,
🏃 भेटायला कुठून येणार
मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..
मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि..
राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही
यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.
वर्गात मराठीचा तास सुरु होता.
वर्गात मराठीचा तास सुरु होता.
प्राध्यापक शिकवीत होते. त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, "कविता आणि निबंध यातला फरक सांगा..."
विद्यार्थ्यांने उत्तर दिलं......
"प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते आणि
बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध!"
शिक्षकांचा कंठ दाटून आला. ..
.......शिक्षक अजुन विचारात आहेत ह्याचं लग्न झालेलं नसताना उत्तर बरोबर आलं कसं...
नवरा : कशी आहेस जानु.??? तु मला miss करत असशील म्हणुन कॉल केला ...
नवरा : कशी आहेस जानु.???तु मला miss करत असशील म्हणुन कॉल केला ... .बायको : एवढंच प्रेम उतु जात होत तर सकाळी सकाळी कशाला भांडले.??........नवरा : 😐 (शांत होतो )(विचार करतो...विचार करतो...विचार करतो...)आयला हा तर घरचा नंबर लागला..
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, ह्रदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे,
जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
ह्रदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे,
अंतःकरणात जिद्द आहे,
भावनांना फुलांचे गंध आहेत,
डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे.....
एक सुंदर मराठी चारोळी
फुलाचा सुगंध चोरला जात नाही
सूर्याची किरणे लपवली जात नाही
आपली बायको कितीही भारी असली तरी
दुसऱ्याची बघितल्याशिवाय अंगातली मस्ती जात
नाही..
केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते, नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते,
केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते,
नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते,
केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार...
सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते,
सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव...
काय उपयोग सांग मानवाअशा या दान धर्माचा ??
कधी शेतक-याला बियाणंदान देऊन बघ...
कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ...
कधी एखाद्या निराधार बालकाचा पालक होऊन बघ...
कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ...
कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ...
कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ...
कधी एखाद्या वृध्दाश्रमासदान करून बघ...
कधी एखाद्या आश्रमातीलनिराधारांवर प्रेम करून बघ...
एकदा दान धर्माच्या व्याख्या बदलून तर बघ !!
जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..
पुस्तकानं माणसाचमस्तक सशक्त होत...
सशक्त झालेलं मस्तककुणाच हस्तक होत नसत...
आणि हस्तक न झालेलं मस्तक कुठेही नतमस्तक होत नसत...!
शाळेचे छत गळके आणिमंदिराचे छत मात्र सोन्याचे ?
शाळेत आज मुलांना बसायला साधी फरशी नाही, मंदिराला मात्र संगमरवरी ?
शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही...
आपला भारत नक्की महासत्ता होणार ?
पायात घालायची चप्पल ए सी मधे विकायला ठेवतात आणिभाजीपाला फूटपाथवर...
म्हणे आमचा देश कृषी प्रधान आणि आत्महत्या करतो शेतकरी...
शेकडो मैल चालतो वारकरी...
अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..!
वाचा, विचार करा,
आणि
पटल तर ११ नव्हे कुणालाही पुढे पाठवा..
कारण ११ जणाना पाठवल्यावर म्हणे चमत्कार घडतो, गोड बातमी मिळते...
असं काहीही होणार नाही
अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला
अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला
सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी
आपला अहंकार सोडणे कधीही चांगले.
स्वतःचा "राग" इतका महाग करा कि
स्वतःचा "राग" इतका महाग करा कि
कोणालाही तो परवडणार नाही,
आणि स्वतःचा "आनंद" इतका स्वस्त
करा कि सगळ्यांना तो फुकट लुटता येईल.
सोमवार, २८ सप्टेंबर, २०१५
अनुग्रह म्हणजे काय..?
समर्थ रामदास शिष्या वेणास्वामी मिरज मठात आपल्या २५/३० विद्यार्थ्यांना स्तोत्रे शिकवीत होत्या. तेवढ्यात मिरजेचा मठ पाहण्यासाठी समर्थ अचानक आले. आणि त्यांना पाय धुवायला पाणी मागितले.
वेणा बाईंच्या शिष्याने देवघरातील देवाच्या पूजेचा तांब्या समर्थांपुढे ठेवला.
तेव्हा समर्थ म्हणाले "या मठातील सारी मुले वेदांती झाली कि काय? देवपूजेचे पाणी पाय धुवायला दिले"?
वेणाबाई वेदांती असल्याने समर्थांनी हा प्रश्न त्यांची चेष्टा करण्यासाठी विचारला. पण त्या सुद्धा कमी नव्हत्या. त्या समर्थांना म्हणाल्या "स्वामी तुम्हीच दासबोधात म्हटले आहे न-
"सद्गुरुहून देव मोठा|
ज्यास वाटे तो करंटा||"
तेव्हा सद्गुरुना पाय धुण्यास देण्यासाठी या पेक्षा शुद्ध उदक आमच्यापाशी नाही. त्यांच्या या उत्तराने समर्थ प्रसन्न झाले.
गुरु आणि शिष्य !
यामध्ये असे प्रेमाचे नाते निर्माण होणे म्हणजेच अनुग्रह !
अनुग्रह हा द्यायचा किंवा घ्यायचा नसतो तर तो व्हायचा असतो.
अनुग्रह होणे म्हणजे वासना कमी होणे, विकार कमी होणे, भगवंताचे प्रेम वाढीला लागणे! गुरुकृपा होणे म्हणजे अनुग्रह!
[09:01, 25/09/2015] +91 82759 25755: मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि..
राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही
यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.
!! प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष व्यसन दोन्हीही वाईटच !!
एक शिष्य आहे ज्याला सुपारी खाण्याचे व्यसन आहे.......
खूप जणांनी समजवले............
पण सवय काही जात नाही............
त्याला स्वतःला हे व्यसन सोडायचे आहे पण व्यसन काही सुटत नाही.........
शेवटी कंटाळून आपल्या गुरूंकडे आला ......
आणि संवाद चालू आहे......................
शिष्य: प्रणाम गुरुवर्य,.......(चाचरत...)
मला, सुपारी खाण्याचे व्यसन लागले आहे........
मला स्वतःला ते सोडायचे आहे..........
पण काही केल्या सुटत नाही........काय करू ?
गुरुवर्य: (हसत)...थांब, तुला उपाय सांगतो........(जागेवरून उठून एका झाडाभोवती मिठी मारतात)
शिष्य: (मनातल्या मनात) अरे, हे काय ......
मला उपाय सांगतो म्हणाले आणि झाडाला का असे मिठी मारून बसले आहेत.......
आपण थांबूया.......
बराच वेळ जातो.......
गुरु झाडाला मिठी मारून आहे तसेच उभे आहेत....
तो शिष्य आता वैतागला .......
शिष्य(कंटाळून) गुरुवर्य, मला माफ करा.....
पण तुम्ही मला उपाय सांगणार होता......
हे झाडाला असे का मिठी मारून बसलात ?
गुरुवर्य: अरे काय करू.....बघ ना.....
या झाडाने मला कसे घट्ट धरले आहे.....
याने जर मला सोडले नाही तर मी कसा
तुला उपाय सांगणार........
शिष्य(हसत) गुरुवर्य, झाडाने तुम्हाला नाही तर तुम्ही झाडाला धरले आहे.....
तुम्ही सोडा ना त्या झाडाला ........
तर ते झाड तुम्हाला सोडेल.............
गुरुवर्य (झाडाची मिठी सोडत आणि हसत) : अरे तुला जर एवढे समजते....
कि झाडाने मला नाही तर मी झाडाला धरले आहे......
मग माझे व्यसन सुटत नाही तू असे कसे म्हणतोस......
अरे व्यसनाने तुला नाही तर तू व्यसनाला धरले आहेस.......
तू जर स्वतःच ठरवलेस तरच तू व्यसन सोडू शकतोस.......
नाहीतर तुझे व्यसन कधीच सुटणार नाही...........
आणि एक दिवस हेच व्यसन तुला शारीरिक,मानसिक धोकादायक ठरणार आहे.......
वेळीच सावध हो................
शिष्य: माफी असावी.....मी आज आपल्या समोर संकल्प करतो....
कि माझे सुरु असलेले व्यसन मी आताच सोडून देतो............
तात्पर्य -
मित्रानो, आज आपण व्यसन हि संकल्पना फक्त विडी,सुपारी,मद्य,गुटखा, तंबाखू या बाबतीत मर्यादित ठेवतो.....
पण आपण प्रत्येक जण व्यसनी आहोत.......
आश्चर्य र्वाटले ?
काहीजण म्हणतील .......नाही, नाही...
व्यसन आणि मी.......शक्यच नाही........
कधीच केले नाही..........
पण मित्रानो....आज प्रत्येकाला व्यसन आहे..........
कोणाला रागात बोलण्याचे व्यसन आहे..........
कोणाला निंदा करण्याचे व्यसन आहे.............
कोणाला वाईट नजरेने बघण्याचे व्यसन आहे..........
कोणाला दुसर्याचे वाईट कसे करता येईल., याचे व्यसन आहे..........
कोणाला अहंकाराचे व्यसन आहे..........
कोणाला मीपणाचे व्यसन आहे...........
कोणाला दुसर्याला लुबाडण्याचे,फसवण्याचे व्यसन आहे........
कोणाला दुसऱ्याला विनाकारण कुजके,कोपरखळीने बोलण्याचे व्यसन आहे........
कोणाला आपल्या आई-वडिलांचे न ऐकण्याचे व्यसन आहे..........
कोणाला काही काम न करता फिरण्याचे व्यसन आहे.........
कोणाला अमुल्य वेळ वय घालवण्याचे व्यसन आहे.........
आता प्रश्न राहतो तो विडी,तमाबखू,गुटखा,मद्य, यांचे व्यसन चालू असलेले मित्रांचा.........
आपण जरी लपून एखादे लहान-मोठे व्यसन करत असलो......
जरी कोणालाच त्या व्यसनाबद्दल काही माहिती नसेल .....
असे असले तरी कोणालातरी हे नक्कीच माहित असते .......
१. आपले गुरु आणि परमेश्वर यांना
२.आपल्याला स्वतःला............
तेव्हा सर्वांना एकच विनंती कोणतेही व्यसन (प्रत्यक्ष व्यसन किंवा अवगूणरुपी व्यसन) आपल्याला नसावे ।
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा.
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी
आणि
शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी...
"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन
जिंकेल तो जग जिंकेल"..
अच्छी बीबी: ना कभी तंग करती है
अच्छी बीबी:
ना कभी तंग करती है
ना कभी झूठ बोलती है
ना कभी शक करती है
ना कभी पैसे मांगती है
ना ही शापिंग को जाती है
और ना ही इस दुनिया में पायी जाती है। 😛
रविवार, २७ सप्टेंबर, २०१५
ज्याला धन कमवायचे आहे, त्यांनी कण सुद्धा वाया घालू नये
ज्याला धन कमवायचे आहे, त्यांनी कण सुद्धा वाया घालू नये आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्यांनी क्षण सुद्धा वाया घालवू नये.
एक मात्र नक्की खंर आहे की,
चांगल्या रस्त्याला गतिरोधक, आणि......
चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच...
गरीब हूँ मगर ख़ुश बहुत हूँ,
गरीब हूँ मगर ख़ुश बहुत हूँ,
क्योंकि दिल के अमीर दोस्तों के साथ रहता हूँ,
उस चाँद को बहुत गुरूर है
कि उसके पास नूर है.....
मगर वो क्या जाने की
मेरा तो पूरा ग्रुप ही कोहिनूर है
एक कुत्रा रस्त्यानं सैरावैरा पळत होता.
एक कुत्रा रस्त्यानं
सैरावैरा पळत
होता.
एका कुत्र्यानं
त्याला अडवून विचारलं," का, रे,
का पळतोस?"
" अरे, काय सांगायच!"
कुत्रा धापा टाकत म्हणाला,
चांगला, म्हणून शोले
पाहायला गेलो, तर तो वीरू
म्हणतोय कसा.....
'बसंती, इन
कुत्तोंके सामने मत नाच!'
म्हंजे,
वा रे वा! काय फुकट
गेलो होतो काय....
चांगला तिकिट काढून गेलो होतो ! 'मत नाच,'
म्हणणारा हा कोण
टिक्कोजी! बसंतीनं पण त्याचं
नाही ऐकलं.
नाचून-नाचून
तिच्या पायातून रक्त
यायला लागलं, तसा तो वीरू पिसाळला; मला म्हणाला,'
कुत्ते, मै तेरा खून पी जाऊंगा!'
मी म्हणलं, अरे, हट्! तुझेच हात
बांधलेले....तू क्या मेरा खून
पियेगा! बसून राहिलो तसाच!
पण, मधीच त्या गब्बरला काय चावलं, काय
माहीत; म्हणाला,'
सांबा, उठा बंदूक, और
लगा निशाना
इस कुत्तेपे !'
मग मात्र म्हंटले,आता आपलं
काही खरं नाही.....पळा .
नया है यह !"
Difference between "Facebook" and "Whatsapp" conversation :
On "Whatsapp" -
Wife : Kab se wait kar rahi hoon. Ghar kab aa rahe ho, Loafer?
Husband : Abhi kuchh pataa nahi. Dimaag mat chaato. Jab dekho pareshaan karti rehti ho.
On "FaceBook" -
Wife : Dear when will you be back? You are the best husband in the world. Miss you. Come back soon.
(Status liked by 50 of her friends)
Husband : Thanks for being there always. So lucky to have a wonderful wife like you. Will be back soon honey. (Status liked by 75 friends, including sister-in-law & mother-in-law)
मंगेश पाड़गांवकरांची सुन्दर कविता
"सा रं का ही स्व तः सा ठी"
देवधर्म पूजाअर्चा
सारं असतं स्वतःसाठी
देवाला यातलं काही
नको असतं स्वतःसाठी
फूलं अर्पण करतो देवाला
ती काय त्याच्याकडे नाहीत म्हणून?
सारी पृथ्वीच ज्याचा बगिचा
त्याला काय करायचंय फुलं घेऊन?
नैवेद्य जो आपण दाखवतो
तो काय देव खातो?
तो तर स्वतःच प्राणीमात्रांचं
भरणपोषण करित असतो
निरांजनाच्या इवल्या ज्योतीने
ओवाळतो आपण प्रभूला
चंद्रसूर्य जातीने
हजर ज्याच्या दिमतीला
स्तोत्रं त्याची गातो ती काय
हपापलाय म्हणून स्तूतीला?
निर्गुण निराकार जो
त्याला अवडंबर हवंय कशाला?
सारं काही जे करायचं
ते स्वतःसाठीच असतं करायचं
प्रार्थनेनं देव बदलत नसतो
स्वतःच स्वतःला असतं सुधारायचं
आवडलेल्या आमटीचा
आवाज करीत मारता भुरका
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
......आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही
जबरदस्त डुलकी येते
धर्मग्रंथ वाचता वाचता
लहान बाळासारखे तुम्ही
खुर्चीतच पेंगू लागता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
..आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही
देवळापुढील रांग टाळून
तुम्ही वेगळी वाट धरता
गरम कांदाभजी खाऊन
पोटोबाची पूजा करता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
..आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही
प्रेमाची हाक येते
तुम्ही धुंद साद देता
कवितेच्या ओळी ऐकून
मनापासून दाद देता
विश्वास ठेवा यात काही पाप नाही
..आनंदाने जगायचं नाकरणं
याच्यासारखा दुसरा शाप नाही
कुणाची मदत करत असताना त्याचा डोळ्यात बघू नका..
कुणाची मदत करत असताना त्याचा डोळ्यात बघू नका..
कारण त्याचे झुकलेले डोळे
तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतो
पति (फ़ोन पर पत्नी से) : तुम बहुत प्यारी हो।
पति (फ़ोन पर पत्नी से) : तुम बहुत प्यारी हो।
पत्नी : थैंक्स
पति : तुम बिल्कुल राजकुमारी जैसी हो।
पत्नी : थैंक्यू सो मच डियर। तुम क्या कर रहे हो?
पति : मजाक
सासरा जावयाला बुटाने मारत होता...!!
सासरा जावयाला बुटाने
मारत होता...!!
एक माणुस -का मारत आहेत त्याला...?
सासरा - मी याला हॉस्पिटलमधुन व्हॉटसअप वर मेसेज केला...!!
कि-- तु बाप झाला आहेस...!!
.
.
मुर्खाने तोच मेसेज ५० लोकांना फॉरवर्ड केला...
"सर्वांना सुखी ठेवणे नक्कीच आपल्या हातात नाही,
"सर्वांना सुखी ठेवणे नक्कीच आपल्या हातात नाही,
परंतु कुणालाच दु:ख न देणे हे नक्कीच आपल्या हातात आहे."
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे !
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !अश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे !
नसो कोणीही आपले आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !!
आदर्श जीवन जगण्यासाठी
1) चूक झाली तर मान्य करा.
2) समोरच्याचे मत विचारात घ्या.
3) चांगल्या कामाची स्तुती करा.
4) आभार मानायला विसरू नका.
5) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.
6) सतत हसतमुख रहा.
7) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.
8) कुणाच्याही व्यंगावर हसु नका.
9) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.
10) टिका तक्रार यात वेळ घालवु नका.
11) कृती पुर्व विचार करा.
12) लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका.
13) क्रोधावर नियंत्रण ठेवा.
14) मैत्री भावना कायम मनी राहु द्या.
15) नेहमी सत्याची कास धरा.
16) इतरांना चांगली वागणूक द्या.
17) सुखाचा गुणाकार व दुखाचा भागाकार करा.
18) विचार करून बोला.
हरतालिका विशेष : अखंड सौभाग्यप्राप्तीचे व्रत.🏽
गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला "हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी गणपतीच्या आईची म्हणजे पार्वतीची पूजा हिंदू महिला करतात. हरतालिका या शब्दाची फोड "हरित` म्हणजे "हरण` करणे आणि "आलिका` म्हणजे "आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे. हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा सुरेख पती मिळावी म्हणून "हरतालिका` हे व्रत अत्यंत श्रद्धापूर्वक करतात.
काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यावर हे व्रत करण्याचा काय अर्थ आहे? पण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात.
हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव "पार्वती` असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, "हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. "तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.`
पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला "अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, "तुम्ही माझ्या तपश्चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने "तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला.
तिचा दृढनिश्चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला "पार्वतीपती` असे नामाभिधान पडले.
इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्चर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत.
रात्री १२ वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही. त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात.
या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. "सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे.
अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करून आरती केली जाते.या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात.🏽
A son took his old father to a restaurant for an evening dinner.
A son took his old father to a restaurant for an evening dinner.
Father being very old and weak, while eating, dropped food on his shirt and trousers.
Others diners watched him in disgust while his son was calm.
After he finished eating, his son who was not at all embarrassed, quietly took him to the wash room, wiped the food particles, removed the stains, combed his hair and fitted his spectacles firmly. When they came out, the entire restaurant was watching them in dead silence, not able to grasp how someone could embarrass themselves publicly like that.
The son settled the bill and started walking out with his father.
At that time, an old man amongst the diners
called out to the son and asked him, "Don't you think you have left something behind?".
The son replied, "No sir, I haven't".
The old man retorted, "Yes, you have! You left a lesson for every son and hope for every father".
The restaurant went silent.
नवीन लग्न झालेलं जोडपं बागेत फिरायला गेलं होतं.ते बागेत फिरत असताना एक कुत्रा त्यांच्याकडे जोरात पळत येत होता.
नवीन लग्न झालेलं जोडपं बागेत फिरायला गेलं होतं.ते बागेत फिरत असताना एक कुत्रा त्यांच्याकडे जोरात पळत येत होता.
हा कुत्रा आता आपल्याला चावणार याची दोघांनाही खात्री पटली.
कुत्रा मला चावला तरी चालेल प,ण माझ्या प्रिय पत्नीला इजा नाही पोचली पाहिजे असा विचार करुन त्याने आपल्या पत्नीला दोन्ही हातावर घेऊन वर उचलले.
कुत्रा त्यांच्याजवळ येऊन जोरजोराने भुंकू लागला.नंतर काय झाले कुणास ठाऊक तो न चावताच खाली मान घालून निघून गेला.
त्याने तिला खाली उतरवले. आपण तिला उचलून कुत्र्यापासून संरक्षण केले यामुळे ती आपल्यावर भलतीच खुश झाली असेल असा विचार त्याच्या मनात सुरु होता तेवढ्यात...
.
.
.
ती ओरडून म्हणाली 'कुत्र्याला दगड ,लाकूड मारणारे खुप पाहिले पण कुत्र्याला फेकून मारण्यासाठी चक्क बायकोलाच उचलणारा तुमच्यासारखा नालायक व्यक्ती आज पहिल्यांदाच पाहिला'
.
तात्पर्य :- बिचा-या नव-यांनी काहीही केले तरी बायका कधीच खुश होत नाहीत.
हे Whats App म्हणजे लहान बाळा च्या लंगोटा सारखे आहे.
हे Whats App म्हणजे लहान
बाळा च्या लंगोटा सारखे आहे.
दर 5 मिनिटांनी ओलं झालंय का
म्हणून बघावं लागतंय राव !!
"Why there is so much stress in life? Its Bcoz,
"Why there is so much stress in life?
Its Bcoz,
We focus too much on
'Good Living Standards',
Rather than
'Living with Good Standards'........
" Good Morning " have Happy Day
मूर्ति बेचने वाले गरीब कलाकार के लिए, किसी ने क्या खूब लिखा है....
मूर्ति बेचने वाले गरीब कलाकार के लिए,
किसी ने क्या खूब लिखा है....
गरीबो के बच्चे भी खाना खा सके त्योहारों में,
इसिलिये भगवान खुद बिक जाते है बाजारों में.....
स्थळ : पुणे :-एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता.
एक नवरा त्याच्या गरोदर बायकोला Hospital मध्ये घेऊन जात होता..
.
.
एक माणूस : तुमच्या मिसेस का?
.
.
नवरा : हो..!
.
.
माणूस : Pregnent आहेत काय??
.
.
.
नवरा : (रागाने) नाही Football गिळलाय तीने... व्हा बाजुला..!
शनिवार, २६ सप्टेंबर, २०१५
असे घडले पुणे...:-
सन 754 : पुण्याचे नाव होते 'पुण्य-विजय'
सन 993 : 'पुनवडी' हे पुण्याचे नाव पडले.
सन:1600 मुळच्या वस्तीला 'कसबा पुणे' हे नाव
होते.
सन 1637 : पुणे शहाजीराजांच्या अंमलाखाली -
सोमवार व रविवार पेठा वसवल्या गेल्या.
सन 1656 : पुणे शिवाजी महाराजांचे अधिपत्याखाली
होते.
सन 1663 : मंगळवार पेठ वसली.
.
सन 1714 : पुण्यावर पेशव्यांची सत्ता सुरू.
सन 1721 : बाजीराव पेशवे यांचेकडून पुण्याची
पुर्नबांधणी सुरू.
सन : 1730 : शनिवारवाडा बांधून पूर्ण झाला.
सन 1734 : पहिल्या बाजीरावाने शुक्रवार पेठ
वसविली
सन 1749 : पर्वती वरील देवालय बांधले.
सन 1750 : वेताळ पेठ वसविली,कात्रज तलाव व
वेशी बांधण्यात आल्या.
सन 1755 : नागेश पेठ वसविली.पर्वती तळे बांधले.
सन 1756 गणेश व नारायण पेठा वसविल्या.
सन 1761 : लकडी पूल बांधण्यात आला.
सन 1769 : सदाशिव व भवानी पेठा वसविल्या
गेल्या.
सन 1774 : नाना,रास्ता व घोरपडे पेठा वसविल्या.
सन 1790 : फडणवीस वेस उभारण्यात आली.
सन 1818 : इंग्रजी अंमल सुरू.खडकी कटक
स्थापना.
सन 1856 : पुणे मुंबई लोहमार्ग सुरू झाला
सन 1857 : पुणे नगरपालिकेची स्थापना.
सन 1869 : सर डेव्हिड ससून रूग्णालय
कार्यान्वित
सन 1875 : संगम ( वेलस्ली) पूल वाहतुकिस खूला
सन 1880 : खडकवासला धरण बांधून पूर्ण
सन 1881 ते 1891: मुठा उजवा कालवा खोदण्यात
आला.
सन 1884 : डेक्कन कॉलेजची स्थापना.
सन 1885 : फर्ग्यसन महाविद्यालयाची स्थापना
सन 1886 : पुणे-मिरज लोहमार्ग सुरू झाल
सन 1915 : आर्यन चित्रपटगृह सुरू झाले
सन 1916 : नगरपालिकेने नगररचनेचे काम हाती
घेतले.
सन 1915 ते 1925 : लक्ष्मी व टिळक रस्ता
तयार व त्यांची सुधारणा.
सन1919 : पुण्यात भुयारी गटारांची योजना हाती
घेण्यात आली.
सन 1921 : पुण्याला वीजपुरवठा सुरू.नव्या पुलाचे
बांधकाम
सन 1941 : सिल्व्हर जुबिली मोटर ट्रान्सपोर्ट
तर्फे नागरी बससेवा सुरू.
सन 1950 : पुणे महानगरपालिकेची
स्थापना.पी.एम.टी.ची विनोदी बससेवा सुरू
सन 1952 : पुणे विद्यापीठाची स्थापना.
सन 1953 : पुणे आकाशवाणी केंद्र सुरू
सन 1961 : पानशेत धरण फुटले.
सन 1973 : सिंहगडावर टी.व्ही.टॉवर सुरू
झाला.पुण्यात दूरदर्शन दिसू लागला.
मित्रांनो आपल्या पुण्याची सगळी बातमी फ़क्त आणि फ़क्त आपल्या ग्रुप वरn
जास्तीत जास्त शेयर करा बकीच्यांना माहिती कळूद्या
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...