रविवार, १३ डिसेंबर, २०१५

शिवशक्ती संगम २०१६ (पश्चिम महाराष्ट्र प्रांत सांघिक एकत्रीकरण )♦ दिनांक ३ जानेवारी २०१६

शिवशक्ती  संगम  २०१६ (पश्चिम महाराष्ट्र प्रांत सांघिक एकत्रीकरण )♦
दिनांक ३ जानेवारी २०१६ 
♠कार्यक्रमा मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांसाठी पूर्ण गणवेश असणे आवश्यक♠ 
♣शिवशक्ती संगम कार्यक्रम पत्रिका 
♦ नोंदणी झालेल्या स्वयंसेवकांनी दुपारी १२ पर्यंत संघ स्थानावर म्हणजेच मारुंजी गाव शिव शक्ती संगम  या ठिकाणी पोहोचणे. ♦ दुपारी १२ ते ३ भोजन आणि गणवेश तयारी ♦ दुपारी ३.३० ते ५.३० प्रत्यक्ष सराव आणि संपत ♦ संध्याकाळी ५. ३० घोष आणि पद्य प्रात्यक्षिक ♦ संध्याकाळी ६. ००प्रनिकीनिशः संपत माननीय भैय्याजी जोशी आणि माननीय मोहनजी भागवत  यांचे मार्गदर्शन ♦ प्रार्थना आणि विकीर 
टिप :-♦ दुपारी ३ नंतर पूर्ण गणवेश असणाऱ्या स्वयंसेवकांसाठी  देखील प्रवेश बंद असणार आहे याची नोंद घ्यावी. ♦तसेच कार्यक्रम पाहण्यास येणाऱ्या पण पूर्ण गणवेश नसणाऱ्या लोकांनी संध्याकाळी ५. ०० पूर्वी शिवशक्ती संगम स्थानी पोहोचावे.  ♦पुणे, पिंपरी चिंचवड परिसरामधील स्वयंसेवकांनी स्वतःची वाहने आणू नयेत. PMPML  ने यावे. शिवशक्ती संगम कार्यक्रमासाठी PMPML  ची रचना होणार आहे. ♦वाहनतळ शिवशक्ती संगम स्थानापासून ४ किमी अंतरावर आहे. ♦शिवशक्ती संगम कार्यक्रम व्यवस्थेसाठी येऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांनी आपल्या तालुका/नगर कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. ♦शिवशक्ती संगम साठी अधिक निधी देऊ इच्छिणाऱ्यानी आपण आधी जिथे नोंदणी केली तिथे संपर्क साधावा . ♦ ओन लाईन नोंदणी चा पुढील आणि शेवटच टप्पा १५ नोव्हेंबर २०१५  ते १५ डिसेम्बर २०१५ राहील.    त्यानंतर नोंदणी केली जाणार नाही. ♦ कार्यक्रम पाहण्यास येणाऱ्या स्वयंसेवाकांव्यतिरिक्त इतर लोकांना शुल्क आकारले जाणार नाही. ♦ गणवेश विक्री  दि. २ जानेवारी ला बंद करण्यात येईल. 
♦विशेष सूचना आपण आपल्या मित्रांची, नातेवाईकांची, परिचितांची नोंदणी करून घ्यावी व गणवेश पूर्ण करून घ्यावा आणि या शिवशक्ती संगम कार्यक्रमा मध्ये सहभागी व्हावे. 
♦तसेच आपला सेल्फी व्होट्सअप अथवा फेस बुक वर टाकावा असे प्रांताकडून सुचवण्यात आले आहे. 
♦तरी वरील सर्व गोष्टींची नोंद घ्यावी आणि या भव्य कार्यक्रमाचा एक हिस्सा व्हावे
°वंदे मातरम °

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc