शनिवार, ५ डिसेंबर, २०१५

बायकोने सांगितल्याप्रमाणे 

मी तिला पहाटे उठवले....




"डार्लिंग, चल उठ..... 

माझ्यासोबत योगाला येणार ना?"



ती : "ओह, म्हणजे मी तुमच्या सारखी जाडी झालेय असं तुम्हाला म्हणायचंय!"

.


.


मी : "अगं तसं नाही. योगा तब्येतीसाठी चांगला असतो."



ती : "ओहो.... म्हणजे मी आजारी आहे असं तुम्हाला म्हणायचंय."


.


.


मी : "अग, तसं नाही. तुला उठायचे नसेल तर राहू दे"



ती : "असं का? मी आळशी आहे असं म्हणायचंय आहे ना तुम्हाला..... हं!"


.


.


मी : "नाही ग बाई, मला काय म्हणायचंय ते तू समजून घेत नाहीयेस."


ती : "ओहो, म्हणजे मी तुम्हाला कधीच समजून घेत नाही..... हो ना...?"


.


.


मी : "हे बघ, मी असं म्हणालो नाहीये."


ती : "म्हणजे मी खोटं बोलतेय."


.


.


मी : "अरे यार, सकाळी सकाळी भांडू नकोस."


ती : "अरे वा, म्हणा म्हणा.... मी भांडकुदळ बाई आहे ना."


.



मी : "ओके, ओके......  ठीक आहे. मीच जात नाही.... मग तर झालं."


ती : "बघा! तुम्हाला कधी जायचंच नव्हतं. फक्त माझ्यावर ढकलायचं होतं...!"


.


.


मी : "ओके बाबा.... तू झोप, मी एकटा जातो. आता तरी खुष?"


ती : "जा.... जा.... मजा करा. नाही तरी तुम्हाला सगळीकडे एकट्यालाच जायचं असतं."


.


.


मी : "प्लीज यार, आता बास्स..... मलाच अपराधी वाटतंय."


ती : "बघा....!!! तुम्ही नेहमी स्वतःचाच विचार करता...! माझी, माझ्या तब्येतीची तुम्हाला काडीची काळजी नाही"


.


.


क़र्रर्रर्रर्रर्


किर्रर्रर्रर्रर्रर्रर


.


.


आताही मी शांत बसून विचार करतोय माझं काय आणि कुठे चुकलं....!!!!!

सांगु शकेल का कोणी???


 😤😤😧😧

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc