शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

आज ११ डिसेंबर २०१५

स्वतंत्र वीर सावरकर यांनी ब्रायटन च्या समुद्र किनार्यावर ११ डिसेंबर १९०९ साली लिहिलेल्या " ने मजसी ने परत मातृ भूमीला सागरा प्राण तळमळला" या अजरामर विरह गीताला १०६ वर्ष पूर्ण झाली. प्रियकर- प्रेयसीची विरह गीते खूप आहेत. आई- मुलगा यांच्या विरहालाही बर्याच जणांनी शब्दबद्ध केले आहे. पण मात्रूभूमीच्या विरहाची ही अत्युत्कट वेदना एकमेवाद्वितीय अशीच म्हटली पाहिजे. या गीतलेखनानंतरच्या तात्यारावांच्या प्रदीप्त जीवनाने या गीताला एक अनोखी झळाळी लाभली आहे आणि देशभक्तिपर स्तोत्राचा आणि सुक्ताचा दर्जा प्राप्त झाला आहे. या निमित्ताने या जाज्वल्य अलौकिक देशभक्ताचं उत्कट स्मरण करण आवश्यक आहे."झाले बहु होतीलही बहु परंतु ह्या सम हा" ज्यांच्या आथक परिश्रमामुळे देशाला स्वातंत्र मिळाल. मरे पर्यंत देशाचीच सेवा करणार्या, आश्या या महान क्रांतीकारकाला विनम्र अभिवादन. 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc