शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

एक गरीब माणूस आपल्या बायको सोबत राहत

होता...

एक दिवस बायको ने

तिच्यासाठी एका कंगवीची मागणी केली जेणेकरून

ती आपल्या लांब सडक केसांची देखभाल करू

शकेल...

पण, नवरा खुप दुःखी अंतकरणाने

म्हणाला की या महिन्यात माझा हात खुप तंग

आहे...

माझ्याकडे एवढे पण पैसे नाहित

की मी माझ्या घड्याळाचा तुटलेला पट्टा दुरूस्त

करू शकेल...

बायकोने पण आपल्या गोष्टीवर जास्त जोर

नाही दिला,

सकाळी नवरा जेव्हा कामावर जात होता...

तेव्हा त्याची नजर एका घड्याळाच्या दुकानावर

पडली. त्याने थोडा विचार केला व त्याचे घड्याळ

कमी किमतीला विकले आणि एक कंगवी विकत

घेतली...

संध्याकाळी घर येताना त्याच्या चेहर्यावर एक

प्रकारचं स्मित हास्य होत

की मी माझ्या बायकोला नवीन कंगवी देतोय....

पण, बायकोचे छोटे छोटे केस पाहून तो चकीत

झाला...

त्याची बायको आपले केस विकून

घड्याळासाठी एक नविन पट्टा हातात घेऊन

उभी होती...

हे पाहून दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. ते

आश्रु याच्यासाठी नव्हते की दोघे

आपल्या प्रयत्नात अपयशी झाले..

ते तर आनंदाश्रु होते जे दोघांच्या प्रेमाची साक्ष

देत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc