नमस्कार ,
३ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेला "शिवशक्ती संगम" हा अतिभव्य कार्यक्रम होतो आहे.
या हिंदु समाजाच्याअतिविशाल सांघीकासाठी आपल्या पुण्यात, किमान एक तास आणि कमाल ८ तास, प्रवास करून सातारा, कोल्हापूर, सांगली, कराड, पुणे जिल्हा , नाशिक आणि नगर येथून तब्बल ८०,००० हुन अतिथी स्वयंसेवक येणार आहेत.
आणि संध्याकाळी कार्यक्रम संपल्यावर हे सर्वजण आयुष्याची शिदोरी ठरेल असा एक विलक्षण अनुभव गाठीशी बांधून आपापल्या गावासाठी निघणार आहेत.
या साऱ्यांचा परतीचा पल्ला लांबचा आहे, किमान एक तास आणि कमाल ८ तासांचा प्रवास...
या सर्व स्वयंसेवकांची रात्रीची जेवण्याची सोय आपल्याला पुण्यातून करावयाची आहे.
आणि यासाठी खूप सुटसुटीत बेत सर्व विचारांती ठरवलेला आहे.
पुण्यातून निघताना आपण या स्वयंसेवकांच्या हाती एक 'शिदोरी' देणार आहोत.
या शिदोरी'मध्ये असणार आहेत **"दहा तिखटा-मिठाच्या पुऱ्या, पुरेशी शेगदाण्याची कोरडी चटणी आणि तिळाच्या दोन वड्या"** आणि आपणा सर्वांचे मन:पूर्वक प्रेम. एका घराने किमान एक शिदोरी द्यावी अशी आपली अपेक्षा आहे.
करू शकतो का आपण इतके आपल्या हिंदु बांधवांसाठी ?
आपल्यापैकी कोथरूडमधे , पौडरोडला रहाणार्या किंवा आपल्या संपर्कात असलेल्या ज्या कोणाला ह्या शिदोरीमधे आपले योगदान द्यायचे असेल त्यांनी अवश्य संपर्क साधावा.
अंबर कर्वे
रामबाग कॉलनी , पौडरोड
9822246641- Whatsapp
7030155556
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा