घे भरारी पतंगासव, बहरू दे तुझे मन, विसर दुःख तू सारे सारे, फुलू दे तुझा प्रत्येक क्षण
उंच नभी उडता पतंग, संथ हवेचा त्याला संग, मैत्रीचा हा नाजूक बंध, राहो नाते आपले अखंड
दिवस संक्रांतीचा, मधुर वाणीचा, रंग उडत्या पतंगाचा, बंध दाटत्या नात्यांचा
विसरून जा दुःख तुझे हे, मनालाबी दे तू विसावा, आयुष्याचा पतंग तुझा हा, प्रत्येक क्षणी गगनी भिडावा
तीळाची गोडी, प्रेमाची माडी, माडीचा जिना, प्रेमाच्या खूणा, मायेचा पान्हा , साऱ्यांच्या मना , म्हणूनच एक तीळ सात जना
जसे तीळ आणि गुळ, तसेच तू आणि मी, येऊन एकत्र, विसरू सारे बहाणे, गाऊ मधुर जीवन गाणे , संक्रांतीच्या शुभेच्छा
पतंग उडू दे उंच आकाशी, घेऊन नवी स्वप्ने उराशी, विसरू आता दुःख सारी सारी, पतंगासवे घेवु आकाशी उंच भरारी ……
आली मकर संक्रांती, या तिळाचा गोडवा दृदयात उतरावा, आणि तिळ गुळासारखे आपले नाते बनवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला
तिळात मिसळला गुळ , त्याचा केला लाडू , मधुर नात्यासाठी , गोड गोड बोलू..
नाते तुमचे आमचे , हळुवार जपायचे , तिळगुळ हलव्यासंगे , अधिक दृढ करायचे..
तुम्हाला व तुमच्या परिवारास...
मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा..!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा