संक्रातीच्या दोन तीन दिवस आगोदरच सगळीकडे शुभेच्छा देणाऱ्या message गर्दी होत असते आणि शुभेच्छा देणाऱ्यांची replya करताना कसरत होत असते......
पण काळ बदलला खूप.....पूर्वी संक्रांत म्हणले कि आईने केलेल्या खमंग गुळाच्या पोळ्या ताव मारत असता व तिळाची वाडी घेवून सर्व परिवार,नातेवायिक,मित्र, यांना देण्यासाठी घराबाहेर पडत असत...
कोणाशी भांडण झाले असेल तर "गोड बोला" असा मंत्र जपत रात्रीच घरी परतायचे ...
एवढे पोट भरायचे कि जेवणाची गरज लागत नसे पण आता त्याची जागा बऱ्यापैकी Facebooks Whats up सारख्या सोशल मेडियाने घेतली आणि तिळगुळ,तिळाची वडी आम्हाला फक्त कॉम्पुटर किंवा मोबयील वर फक्त "LIKE " करावी लागते ...
पूर्वी नात्यात गोडवा होता त्यामुळे घरगुती तिळगुळ पुरेसे असायचे. कदाचित पुढच्या पिढीला या सणाचे महत्व आणि कसे साजरे करयचे व त्या मागचा हेतू काय हे शिकवावे लागणार आहे.......
एक तर नाती कमी होत चाललीत आणि आहेत ती नाती टिकवायची कि नाही या वर आपण संभ्रमित आहोत कारण त्यातला गोडवा कमी झालेला असतो ."गोड बोला" म्हणजे नाती जपा असा संदेश या नात्यामधून द्यायचा असतो हे शिकवण्या आगोदर "नाते जपणे" म्हणजे म्हणजे काय असते हे शिकवले महत्वाचे आहे........
संक्रमणाची खरी गरज नात्यात आहे, त्यांच्यात निर्माण झालेली दरी कमी करण्यासाठी आहे, सूर्य जसा दक्षिणायन सुरु झाल्याने पृथ्वीपासून थोडा दूर जातो आणि मग थंडीची जाणीव होते. त्याच्या उबेत काय सामर्थ्य आहे ते कळते. मग ।तो उत्तरानायात प्रवेश करून जवळ यायला लागला कि त्याच्या मायेच्या उबेने पृथ्वीचे अंग शहारून येते .......ती मायेची उब तो निर्माण झालेला दुरावा काढून टाकते......तेच तत्व आपण निसर्गाकडून शिकायला हव ........
नाती जवळ यावीत म्हणून हि संधी आपल्याला आपली संस्कृती या "संक्रांतीच्या" सणानिमित्त देत असावी..... अशा वेळी मनाचा संकुचित वृत्ती त्यागून "औदार्याचे तिळगुळ" सर्वानीच वाटायला हवेत
या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे, स्वछंदपणे आकाशात भरारी घ्या...आपले मन मोकळे ठेवा असे तर सुचविण्यासाठी असेल का ? ......या स्पर्धेच्या जगात दुसऱ्याचा पतंग कसा काटायचा याचीच गणित मांडली जातात....
पतंग ताणून ठेवला कि तो तुटणारच....पण जर थोडी त्याला ढील दिली तर तो उंच भरारी घेतो हाच नियम आपल्या नातेसंबंधांमध्ये लावला तर......नाते ताणण्यापेक्षा त्यांना "समजुतीची" थोडी ढील दिली तर......या संक्रमणात अस काहीतरी करून पाहिलं तर नात्याचा तिळगुळ खऱ्या अर्थाने वाटला जायील..........
तुम्हा सर्वाना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा.......................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा