बुधवार, २७ एप्रिल, २०१६

रात्रीस खेळ चाले ----------- काही प्रश्न?


१) माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?


२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय? 


३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली? 


४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?


५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार? 


६) सुसल्याने अजुन ड्रेस शिवलेत का? निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या? 


७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा! 

ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच लॅपटॉप उघडुन बसणार का ?


८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे, जाताना दिसत नाही, बाकी मुलगी कामसु आहे. 


९) धाकटा भाऊ अभिराम, फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणार?


१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत, 

त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे? 

अजुन बरेच काही प्रश्न आहेत ,

पण तूर्तास हेच

एवढे एपिसोड झाले एक भुत  दिसेना !!! 

कराव काय???

🤔🤔🤔

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc