गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

अशक्यही शक्य करतील स्वामी

काल जे अक्कलकोटमध्ये होते त्यांचा अनुभव . 


दर वर्षी अक्कलकोटात श्रीस्वामी समर्थ प्रकटदिनाला अक्कलकोट वटवृक्ष मठ ते समाधी मठा पर्यंत स्वामींच्या गजरात दंडवत करत जातात आणि दंडवतासाठी पाण्याने जवळजवळ १.५ किमी अंतराचा सर्व रोड पाण्याने धुतात. पण दुष्काळ असल्याकारणाने या वर्षी रोड धुतला नाही. पण स्वामींची इच्छा कोण मोडणार. चक्क एप्रिल मध्ये आणि ते पण दंडवताच्या वेळेस विजांचा कडकडात होऊन पाऊस पडला आणि सर्व भक्तांचा दंडवत संपला तसा पाऊसही गेला. ..दंडवतासाठी रोड धुवून निसर्गाने स्वामी सेवा केली..भर उन्हळ्यात स्वामी भक्तांना उन्हाचा त्रासही सहन करावा लागला नाही . स्वामींच्या कृपेने ती प्रथा चालु राहिली . याला काय म्हणावे निसर्गाचा चमत्कार की स्वामींचा प्रसाद... 


ll श्री स्वामी समर्थ ll

🚩अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधी राज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc