शनिवार, २ एप्रिल, २०१६

गुळ तुपात चुरडून पोळी

गुळ तुपात चुरडून पोळी

लाडू अवीट गोडीचे

चुरमुरे चणे मिसळून

लुटले डोंगर भेळीचे


वाटीत खडा इवलासा

पिवळ्या तांबूस गूळाचा

त्या सोबत बसल्या बसल्या

चाखला स्वाद दाण्यांचा


नव्हतीच बिस्किटे तेव्हां

फडताळ भरून रचलेली

चुटकीसरशी शिजणारी

मॅगीही नव्हती जन्मली


जे होते, पुष्कळ होते

आवडही माफक होती

चोचले विदेशी नव्हते

भूकही स्वदेशी होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc