बुधवार, २७ एप्रिल, २०१६

पु. ल. म्हणतात -


🔵 जाळायला काही नसलं की पेटलेली काडीसुध्दा आपोआप विझते.


🔵 खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.


🔵 प्रोब्लेम्स नसतात कोणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रोब्लेमला उत्तर असतंच. 

ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो.


🔵 शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.


🔵 माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर? याची त्याला भिती वाटते.


🔵 बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण.


🔵 खरं तर सगळे कागद सारखेच…

त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.


🔵 रातकिडा कर्कश ओरडतो यात वादच नाही. त्याचा त्रास होतो.

पण त्याहीपेक्षा जास्त त्रास तो कुठे बसून ओरडतो हे सापडत नाही, याचा होतो.


🔵 आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.


🔵 सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही.


🔵 कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे.


🔵 रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वृंदावनातच राहते. तिच्यापुढे आपल्यालाच उभं राहावं लागतं.


🔵 आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कर्ष होतोय.


🔵 ज्यांच्या असण्याला अर्थ असतो, त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते.


🔵 आयुष्य फार सुंदर आहे...

ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे...

माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे........


🌹🌹🌹 🌹🌹🌹🌹🌹🌹

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc