गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

म्हणून या पुढे बाहेरचे खाताना जरा सांभाळून !!!!!!!!!!!!!!!!!!

बाटली बंद "लोणची" आणि त्यावर तरंगणारे तेल पाहून संशय आला. गोडेतेलाची किंमत, लोणच्यामधील तेलाचे प्रमाण व लोणच्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......


दोन चार ठिकाणी चाचपणी केली. मग उलगडा झाला. लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल (शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी) असते.


बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते "सायट्रिक acid" ची. 

ब्लोटिंग पेपर + सायट्रिक acid = फक्कड लस्सी.


हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास " तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.


हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर "पाणी-पुरी" मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो .....भैय्याजी थोडा पानी और.....कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्षा खूप स्वस्त आहेत.


ऊसाचा रस ऊन्हाळ्यात चांगला. पण काही "कलाकार" ह्यामध्ये "सॅकरिन" वापरतात्..... थोड्या रसात भरपूर पाणी + सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा. पण ह्याचा वापर एवढा सर्रास नाही.


टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून" बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो.


नेस्ले / एच्.एल्.एल. इ. कंपन्या टोमॅटो सॉस टोमॅटोपासून बनवत असतील ही...


ही थोडी झलक.


एक चुना सोड्ल्यास ह्यामधील कोणतीही भेसळ शरीरास विशेष हानी कारक नाही. फक्त फसवणुक आहे .


शरीरास विशेष हानी कारक भेसळी विषयी परत केंव्हा तरी.


तो पर्यन्त "वडापावाच्या" लसूण चट्णीत लाकडाचा / नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात  लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना ? एवढी खात्री करा झाले.


म्हणून या पुढे बाहेरचे खाताना जरा सांभाळून !!!!!!!!!!!!!!!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc