गुरुवार, २ जून, २०१६

" कट्टी आणि बट्टी"


अगोदरची पिढी तशीखूपच  गरीब  होतीतरीही ती एकमेकांच्याबरीचशी   करीब होती
आवर्जून सगळेजणंजाणं येणं ठेवीत होतेसुख असो दुःख असोहात पुढे येत होते
काका काकू , मामा मावशीआपलेपणा वाटायचादिवाळीत , लग्नाकार्यातअख्खा वाडा नटायचा
प्रत्येकजण प्रत्येकालाभरभरून बोलायचाआपलं माणूस दिसलं कीसंपूर्णपणे उकलायचा
हसणं काय रुसणं कायसारं कसं आतून यायचंकट्टी संपून बट्टी झाली कीपुन्हा प्रेम ऊतू जायचं
आतलं दुःख सांगितलंकीहलकं हलकं वाटायचंअनुभवाच्या शिदोरीतूनबरंच  काही  भेटायचं
पहाडा सारख्या प्रश्नांनाहीतेंव्हा उत्तरं सापडायचीसगळीच माणसं चारचौघातसुखदुःख  पाखडायची
अहंकार आणि स्वार्थामूळेआता अनर्थ घडला आहेनातेगोते  असून सुद्धामाणूस एकाकी पडला आहे
सुबत्तेला सुख समजूनआपली माणसं तोडू नयेजगाशी नातं जोडतानाजुनी मुळे खोडु नये
भाऊ भाऊ बहिणी बहिणीएकमेका कडे जातात का ?समोरा समोर आल्यानंतरदोन शब्द बोलतात का ?
वर्षानुवर्षे कॉलनीत राहूनकुणीच आपलं वाटत नाहीमी पणाच्या तोऱ्या मुळेशेजाऱ्याशी पटत नाही
कुठे तरी कधी तरीहा दुरावा संपला पाहिजेघर असो दार असोआपण माणूस जपला पाहिजे
उत्तरार्धात अनेक प्रश्नजेंव्हा समोर नाचू लागतातभांबावलेली माणसं तेंव्हाधर्मग्रंथ वाचू लागतात
चलतीच्या काळात सुद्धामिळून मिसळून वागावंनेहमी चांगली बुद्धी दे एवढंच देवाला मागावं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc