गुरुवार, ७ जुलै, २०१६

संघावाचून कोण स्विकारील काळाचे आव्हान .

या वेळची आषाढ़ी वारी निर्मल वारी म्हणून साजरी करायची असे संघाने ठरवले . आणि काय अश्चर्य हजारो स्वयंसेवकांची फौज तयार झाली . दिंड्या मुक्कामाच्या गावातून पुढे गेल्या की मागे उरायचे ते शौचाचे व घाणीचे साम्राज्य पण माऊलींवरील श्रद्धेपोटी व हिंदू धर्मावरील प्रेमापोटी वारी रस्त्यावरील सर्व गावे ही घाण मुकाट्याने सहन करीत . पण राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाच्या कार्यकर्त्यांनी गावांची होणारी ही अडचण ओळखली आणि निर्मल वारीचे नियोजन सुरू झाले. अडचणींचे डोंगर उभे राहिले पण हार मानील तो स्वयंसेवक कसला ? दिंड्यांबरोबर निघाले हे स्वच्छतेचे वारकरी फिरती शौचालये घेऊन . ज्या गावात दिंडीचा मुक्काम त्या गावात अगोदरच ही शौचालये तयार . परिणाम वारी आता निर्मल झालीय . संघाच्या निरपेक्ष वृत्तीने काम करणार्या स्वयंसेवकांना आशिर्वाद देत दिंड्या पुढे सरकताहेत अशक्य ते शक्य करतो तोच स्वयंसेवक आणि त्याला असा कणखर बनवतो तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची नियमित होणारी शाखा.        

                                            🇮🇳🚩जय श्रीराम 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc