शुक्रवार, १५ जुलै, २०१६

सोडता येईल का✨☀

🔸माझ्या हातात चहाचा कप होता ऊभे राहून चहा पित होतो. अचानक तोल गेला.  कप पडु नये म्हणून सांभाळत होतो तोच् मी पडलो, हाता च्या कोपराला लागले.  कपही फुटला. जर मी कप सोडला असता तर लागले नसते. आपल्यालाही असाच अनुभव बरेच वेळा आला असेल.

🔸शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात. गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची. मला विचारलच नाही; मला निमंत्रणच दिलं नाही; माझं नावंच घेतलं नाही; मला बसायला खुर्चीच दिली नाही.. सोडुन द्या हो.

🔸सोडायला शिकलं कि मग पहा, निसटुन चाललेल्या नात्यांमधे  पुन्हा जीवन येईल. सुक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखु देत नाही. तो सोडता आला कि झालं. तो लगेच सोडता येणारच नाही. महाकठिण आहे ते. मला वाटतं त्यासाठी "चांगल्या मित्रांची संगत" यापेक्षा सुंदर आणि सोपा मार्ग दुसरा नसावा..!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc