रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

रा. स्व. संघ आणि सामाजिक रक्षाबंधन_

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रक्षाबंधनाच्या निमित्ताने नेहमीच समाजातील सर्व स्तरातील लोकांमध्ये मिसळून सगळा समाज जोडण्याचे काम करत असतो. संघाच्या पुणे महानगराने यावर्षी रक्षाबंधनाला अजून एक सामाजिक आशय जोडला आहे. पर्यावरण-रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने १८ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट या कालावधीत संघाने *ई-कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर* हे सामाजिक अभियान करायचे ठरवले आहे.

दि. १८ पासून संघाचे स्वयंसेवक घरोघरी जाऊन बंधुभगिनींना राख्या बांधून *ई-कचरा आणि प्लॅस्टिकमुक्त परिसर* अभियानाची माहिती देऊन नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत. रविवार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या दरम्यान पुणे शहराच्या विविध भागांत २५ प्रमुख केंद्रे आणि ३०० उपकेंद्रांच्या माध्यमातून ई-कचरा व प्लॅस्टिक यांचे संकलन करण्यात येणार आहे.

आपण सर्वांनी या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा ही विनंती. अधिक माहिती खालील संकेत स्थळांवर मिळू शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc