समर्थ रामदास शिष्या वेणास्वामी मिरज मठात आपल्या २५/३० विद्यार्थ्यांना स्तोत्रे शिकवीत होत्या. तेवढ्यात मिरजेचा मठ पाहण्यासाठी समर्थ अचानक आले. आणि त्यांना पाय धुवायला पाणी मागितले.
वेणा बाईंच्या शिष्याने देवघरातील देवाच्या पूजेचा तांब्या समर्थांपुढे ठेवला.
तेव्हा समर्थ म्हणाले "या मठातील सारी मुले वेदांती झाली कि काय? देवपूजेचे पाणी पाय धुवायला दिले"?
वेणाबाई वेदांती असल्याने समर्थांनी हा प्रश्न त्यांची चेष्टा करण्यासाठी विचारला. पण त्या सुद्धा कमी नव्हत्या. त्या समर्थांना म्हणाल्या "स्वामी तुम्हीच दासबोधात म्हटले आहे न-
"सद्गुरुहून देव मोठा|
ज्यास वाटे तो करंटा||"
तेव्हा सद्गुरुना पाय धुण्यास देण्यासाठी या पेक्षा शुद्ध उदक आमच्यापाशी नाही. त्यांच्या या उत्तराने समर्थ प्रसन्न झाले.
गुरु आणि शिष्य !
यामध्ये असे प्रेमाचे नाते निर्माण होणे म्हणजेच अनुग्रह !
अनुग्रह हा द्यायचा किंवा घ्यायचा नसतो तर तो व्हायचा असतो.
अनुग्रह होणे म्हणजे वासना कमी होणे, विकार कमी होणे, भगवंताचे प्रेम वाढीला लागणे! गुरुकृपा होणे म्हणजे अनुग्रह!
[09:01, 25/09/2015] +91 82759 25755: मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि..
राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही
यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा