एक शिष्य आहे ज्याला सुपारी खाण्याचे व्यसन आहे.......
खूप जणांनी समजवले............
पण सवय काही जात नाही............
त्याला स्वतःला हे व्यसन सोडायचे आहे पण व्यसन काही सुटत नाही.........
शेवटी कंटाळून आपल्या गुरूंकडे आला ......
आणि संवाद चालू आहे......................
शिष्य: प्रणाम गुरुवर्य,.......(चाचरत...)
मला, सुपारी खाण्याचे व्यसन लागले आहे........
मला स्वतःला ते सोडायचे आहे..........
पण काही केल्या सुटत नाही........काय करू ?
गुरुवर्य: (हसत)...थांब, तुला उपाय सांगतो........(जागेवरून उठून एका झाडाभोवती मिठी मारतात)
शिष्य: (मनातल्या मनात) अरे, हे काय ......
मला उपाय सांगतो म्हणाले आणि झाडाला का असे मिठी मारून बसले आहेत.......
आपण थांबूया.......
बराच वेळ जातो.......
गुरु झाडाला मिठी मारून आहे तसेच उभे आहेत....
तो शिष्य आता वैतागला .......
शिष्य(कंटाळून) गुरुवर्य, मला माफ करा.....
पण तुम्ही मला उपाय सांगणार होता......
हे झाडाला असे का मिठी मारून बसलात ?
गुरुवर्य: अरे काय करू.....बघ ना.....
या झाडाने मला कसे घट्ट धरले आहे.....
याने जर मला सोडले नाही तर मी कसा
तुला उपाय सांगणार........
शिष्य(हसत) गुरुवर्य, झाडाने तुम्हाला नाही तर तुम्ही झाडाला धरले आहे.....
तुम्ही सोडा ना त्या झाडाला ........
तर ते झाड तुम्हाला सोडेल.............
गुरुवर्य (झाडाची मिठी सोडत आणि हसत) : अरे तुला जर एवढे समजते....
कि झाडाने मला नाही तर मी झाडाला धरले आहे......
मग माझे व्यसन सुटत नाही तू असे कसे म्हणतोस......
अरे व्यसनाने तुला नाही तर तू व्यसनाला धरले आहेस.......
तू जर स्वतःच ठरवलेस तरच तू व्यसन सोडू शकतोस.......
नाहीतर तुझे व्यसन कधीच सुटणार नाही...........
आणि एक दिवस हेच व्यसन तुला शारीरिक,मानसिक धोकादायक ठरणार आहे.......
वेळीच सावध हो................
शिष्य: माफी असावी.....मी आज आपल्या समोर संकल्प करतो....
कि माझे सुरु असलेले व्यसन मी आताच सोडून देतो............
तात्पर्य -
मित्रानो, आज आपण व्यसन हि संकल्पना फक्त विडी,सुपारी,मद्य,गुटखा, तंबाखू या बाबतीत मर्यादित ठेवतो.....
पण आपण प्रत्येक जण व्यसनी आहोत.......
आश्चर्य र्वाटले ?
काहीजण म्हणतील .......नाही, नाही...
व्यसन आणि मी.......शक्यच नाही........
कधीच केले नाही..........
पण मित्रानो....आज प्रत्येकाला व्यसन आहे..........
कोणाला रागात बोलण्याचे व्यसन आहे..........
कोणाला निंदा करण्याचे व्यसन आहे.............
कोणाला वाईट नजरेने बघण्याचे व्यसन आहे..........
कोणाला दुसर्याचे वाईट कसे करता येईल., याचे व्यसन आहे..........
कोणाला अहंकाराचे व्यसन आहे..........
कोणाला मीपणाचे व्यसन आहे...........
कोणाला दुसर्याला लुबाडण्याचे,फसवण्याचे व्यसन आहे........
कोणाला दुसऱ्याला विनाकारण कुजके,कोपरखळीने बोलण्याचे व्यसन आहे........
कोणाला आपल्या आई-वडिलांचे न ऐकण्याचे व्यसन आहे..........
कोणाला काही काम न करता फिरण्याचे व्यसन आहे.........
कोणाला अमुल्य वेळ वय घालवण्याचे व्यसन आहे.........
आता प्रश्न राहतो तो विडी,तमाबखू,गुटखा,मद्य, यांचे व्यसन चालू असलेले मित्रांचा.........
आपण जरी लपून एखादे लहान-मोठे व्यसन करत असलो......
जरी कोणालाच त्या व्यसनाबद्दल काही माहिती नसेल .....
असे असले तरी कोणालातरी हे नक्कीच माहित असते .......
१. आपले गुरु आणि परमेश्वर यांना
२.आपल्याला स्वतःला............
तेव्हा सर्वांना एकच विनंती कोणतेही व्यसन (प्रत्यक्ष व्यसन किंवा अवगूणरुपी व्यसन) आपल्याला नसावे ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा