रविवार, १८ ऑक्टोबर, २०१५

दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मी व्हरंड्यात बसलो होतो. तेवढ्यात माझ्या घराच्या कंपाउंड मध्ये

दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी मी व्हरंड्यात  बसलो होतो. तेवढ्यात माझ्या घराच्या कंपाउंड मध्ये एक थकल्या सारखा दिसणारा परंतु धष्टपुष्ट कुत्रा शिरला. 

त्या गळ्यातील पट्ट्याकडे, त्याच्या सुदृढ़ शरीराकडे पाहुन वाटते होते हा कुणा चांगल्या घरचा पाळीव कुत्रापि आहे. 

मी त्याला जवळ बोलाऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. 

तो शेपुट हालवत तिथेच बसुन राहीला. 

मी उठून घरात निघालो तसा तोही मागोमाग हाॅल मध्ये आला आणि खिडकी शेजारील एका कोपर्यात शाहण्या सारखा पाय दुमडून पुढिल दोन पायात तोंड खुपसून बसला. 

पाहता पाहता झोपीही गेला. 

मी पण हाॅलचे दार बंद करून सोफ्यात बसुन राहीलो. तासाभराने तो उठुन दाराकडे निघाला मी ही उठून दार उघडले तो सरळ कंपाउंड बाहेर गेला बहुधा त्याच्या घरी गेला असावा! दुसर्या दिवशी पुन्हा त्याच वेळेला तो आला तसाच हाॅलच्या कोपर्यात झोपला तासभराने उठून निघुन गेला. 

मग हे रोजचेच झाले ते यायचा झोप काढायचा अाणि निघुन जायचा असे कित्येक आठवडे झाले. 

मला उत्सुकता लागुन राहिली हा नेमका कुणाचा आहे ? 

मी एके दिवशी त्याच्या पट्टयात एक चिठ्ठी लिहुन अडकवली, 

"तुमचा कुत्रा माझ्या कडे रोज येऊन झोप काढतो हे तुम्हाला माहीत आहे का?" 

दुसर्या दिवशी पुन्हा रोजच्याच वेळेला तो कुत्रा आला पण यावेळी त्याच्या पट्याला एक चिठ्ठी दिसत होती मी ती काढुन वाचु लागलो.....

"तो एक चागल्या घरचा कुत्रा आहे इथे माझ्या सोबतच राहातो पण माझ्या बायकोच्या अखंड वायफळ बडबडीला कंटाळून थोडीशी तरी झोप मिळावी म्हणुन रोज तुमच्याकडे येतो.... उद्सापासुन मी पण त्याच्या सोबत येत जाऊ का ? असेच चिठ्ठी लाऊन कळवणे!"..........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc