मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

श्रीराम समर्थ|| माझे गोंदवले....


सद्गुरू श्रीमहाराजांची गोजिरी मूर्ती म्हणजे माझे गोंदवले!

 श्री रामनामाने भारलेले वातावरण आणि आनंदाच्या 

उत्स्फूर्त लहरी म्हणजे माझे गोंदवले!

 जिथे प्रसाद म्हणुन रोज मायेने जे पोटभर गोडाचे जेवण 

दिले जाते आणि ज्यामुळे मन तृप्त होते आणि नेहमी

प्रसादासाठी यावेसे वाटणे म्हणजे माझे गोंदवले!

 जिथे सेवेकरींच्या मुखावर कितीही कामाचा ताण पडला

 तरी नेहमी एक तृप्ततेचा भाव असतो ते स्थळ म्हणजे माझे 

गोंदवले!

 जेथुन दर्शन,प्रसाद घेवुन परतताना मन भरुन येते, पाय जड होतात ते म्हणज माझे गोंदवले!

 जिथल्या रस्त्यांवरून चालताना "इथे प्रत्यक्ष माझे 

श्रीमहाराज चालले" हा भाव क्षणोक्षणी मन भारून टाकतो 

अशी जागा म्हणजे माझे गोंदवले! 

जिथे काकड आरतीनंतरच्या लोणी-साखरेची चव

अनुभवल्यानंतर हे  एक आपले भाग्यच आहे असे मनोमन 

वाटणे असे स्थळ म्हणजे माझे गोंदवले!

 जिथे श्रीरामाच्या मुर्ती चक्क या कलियुगात महाराजांच्या

 काशीला जाण्याच्या विरहाने पाणावल्या आणी श्रीरामाने

त्याना प्रेमाने जाण्यापासुन रोखले ते म्हणजे माझे गोंदवले!

जिथे प्रत्यक्ष पूज्य ब्रह्मानंद महाराज, पूज्य आनंदसागर 

महाराज, पूज्य बाबा बेलसरे आणि असंख्य उच्च कोटीच्या 

साधकांचे पाय लागले आणि अजूनही त्यांच्या नाम-लहरी 

जिथे जाणवतात ते नामाचे आगर म्हणजे माझे गोंदवले! 

जिथून निघताना डोळे पाणावतात आणि परत गावी 

आल्यावर मन मात्र जेथेच रेंगाळत रहाते  ते मायेचे 

माहेर म्हणजे माझे गोंदवले !

फक्त तुम्ही रामनाम घ्या बाकी तुमचा सर्व प्रपंच मी 

संभाळतो आणी 'जेथे नाम तेथे माझे प्राण'हे शेवटी

कळकळीने सांगीतले असे पुण्य श्रेत्र म्हणजे माझे

गोंदवले...!!!

...असे माझ्या या श्रीमहाराजांच्या गोंदवले बद्दल काय,

आणी किती सांगु..हे अनुभवणे म्हणजेच माझे गोंदवले..!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc