शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

संथ्याकाळची वेळ नाक्यावर ती हातात पिशवी घेउन उभी, पोलादपुरला अत्ता जाण अत्यंत गरजेच होत पण

संथ्याकाळची वेळ नाक्यावर ती हातात पिशवी घेउन उभी, पोलादपुरला अत्ता जाण अत्यंत गरजेच होत पण आज भरपुर पावसाने ब-याच बस रद्द झाल्या होत्या.जसजसा वेळ पुढे सरकत होता तसा तिचा धीर सुटत चालला तेवढ्यात एक कारवाला आला त्याने एकटी बाई बघुन गाडी थांबवली.गाडीवाला तसा बरा वाटत होता.

" कुठे जायचय"

" पोलादपुर"

" चला सोडतो"

" किती घेणार"

" काही नको चला."

तिने त्याच्यावर विश्वास टाकला आणि गाडीत मागे बसली आता अंधार वाढू लागला होता.गाडीवाल्याला रेअर मीररमध्ये ति दिसत होती.दिसायला तशी ती नाकी डोळी निटस होती.गाडी नातू धरण सोडून घाटाला लागली. आता गाडीवाला थोड अघळपघळ बोलायला लागला.तरीही ती जमेल तस न घाबरता त्याला उत्तर देत होती.एकदा दोनदा त्याने गाडीत काहीतरी प्राॅब्लेम वाटतोय म्हणून सांगीतल.तिला बघून तो जरा अस्वस्थच झाला होता.सतत आरशामध्ये तिचा चेहरा बघत होता.तिच्या ते लक्षात आल.कशेडी घाटाच चढ संपतो तिथे बाजूच्या कड्यावर पांढरे पट्टे ओढलेले आहेत गाडी तिथपर्यंत आली.गाडीवाल्याने टेप चालू केला आणि परत आरशात बघीतल तेवढ्यात मागे बसलेल्या तिने लांब हात करून टेपच बटण बंद केल आणि घोघ-या आवाजात" गाडी गुपचूप पोलादपुर स्टॅडला घे" अस सांगीतल.एवढा मोठा हात आणि मधे फक्त एकच बोट असलेला हात बघून गाडीवाल्याला घाम फुटला.तोवरतो डाकबंगला सोडून गाडी स्टॅडच्या जवळ आली.

" थांबव आता" परत तसाच घोगरा आवाज.त्याने करकचून ब्रेक लावला.मागचा दरवाजा धाडकन लावाला गेला.तिने पुढे येउन पुढच्या काचेवर टकटक केल " आज सुटलायस आज अवस होती परत भेटलास तर सोडणार नाही." घाबरून त्याने गाडी सुसाट महाडच्या दिशेने सोडली.

.

.

.

.

.

.

.

.

इकडे हीने सुटकेचा निश्वास टाकला.सेल्फीस्टीक बंद करून परत पिशवीत टाकली आणि स्टॅडवरती असलेल्या रिक्षेत बसली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc