शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रूपांचा साक्षात्कार

नवरात्रीचे नऊ दिवस

नऊ रूपांचा साक्षात्कार

आदिमाया वसे नऊरूपी

दीप उजळला घटी....!!!

प्रथमा शैलपुत्री तू

ये वरदान देण्या ॥

द्वितीया ब्रह्मचारिणी तू

ये सामर्थ्यदान देण्या ॥

तृतीया चंद्रघटा तू

ये संकटास निवारण्या ॥

चतुर्थ नाम कुष्मांडा

कर ब्रह्मांड उत्पन्ना ॥

पंचमा तू स्कंदमाता

ये विश्वाला तारण्या ॥

षष्ठ नाम कात्यायनी

ये कृपाफल देण्या ॥

सप्तमा तू कालरात्री

दे वरदान भक्ता ॥

अष्टमा तू महागौरी

ये पापनाश करण्या ॥

नवमा तू सिध्दिदात्री

ये सिध्दीदान देण्या ॥

आई तुझ्या कृपाप्रसादे

भवतु सर्व मंगल।

दुष्ट-संकट निवारण्या दे

भक्ताला तू बळ ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc