घरी आले Wi-Fi…
अन् बायको झाली हाय-फाय....
कितीही जोरात आवाज द्या...
कानावर काही पडतंच नाय...
H - अगं जरा ऐकतेस काय...?
W - थांबा....मला वेळ नाय...
H - एवढी कशात बिझी हाय ?
W - हे मेले WhatsApp चालतच नाय...
H - मी काय म्हणत होतो....
W - बोला, मी ऐकते हाय...
H - मी बाहेर चाललो होतो...
काही सामान आणायचे काय ?
W - किती वेळा सांगू तुम्हाला ?....
WhatsApp वर लिस्ट पाठवली हाय....
H - पिंट्या अजुन आला नाही...
क्लास कधी सुटणार हाय ?
W - तुम्ही काळजी करू नका...
मी Status पाहीलं हाय...!
H - एवढं कसलं टेन्शन आलंय ?...
कोणती वस्तू सापडत नाय ?
W - वस्तू-बिस्तू खड्यात गेली...
कालचा message सापडत नाय....
H - आज मला सुट्टी हाय...
नाश्ता-पाण्याचा बेत काय ?
W - Group मधे Video आलाय...
तशीच डिश करणार हाय...!
H - अगं, तुझी ती मैत्रिण,
बऱ्याच दिवसांत दिसली नाय....
W - तुम्हाला तिच्याशी काम काय ?
WhatsApp वर मी तिच्या टच मधे हाय...
H- काय गं, आज-काल माझ्याशी
तू हसून-खेळून बोलतच नाय...
W - प्रॉब्लेम तर तुमचाच हाय...
माझे smiley तुम्ही बघतच नाय...!!
😄😄😄😄😄😄😄😄😄
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा