शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

फळांचा राजा असणाऱ्या आंब्याची स्तुती ऐकून..

आकर्ण्याम्रस्तुतिं जलमभूत्तन्नारिकेलान्तरं प्रायः कण्टकितं तथैव पनसं जातं द्विधोर्वारुकम् |

आस्तेऽधोमुखमेव कादलमलं द्राक्षाफलं क्षुद्रतां श्यामत्वं बत जाम्बवं गतमहो मात्सर्यदोषादिह ||


अर्थात :-

फळांचा राजा असणाऱ्या आंब्याची स्तुती ऐकून..

नारळाच्या पोटात [मनात] पाणी  झालं.

फणसाच्या अंगावर काटा उभा राहिला.

उंब्राचं फळ तर फुटलंच.

केळ्यानी मानच खाली घातली.

द्राक्ष काळपट तर पडलीच आणि लहानही झाली.

जांभूळ [हेव्यानी] जांभळ पडलं.

हे सगळं  मत्सरामुळे बरं.!


आम्रऋतुच्या शुभेच्छा !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc