सोमवार, २ मे, २०१६

थोडा विचार करा

आजवर किती पाणी आपण या जमिनीतून उपसा करुन वापरलय . ...अगदी बेमुर्वतखोर पणे वापरलय .....

पण आता हे पाणी परत जमिनीला परत द्यायची वेळ आलीय .

यावर्षी पाउस चांगला पडणार आहे . 


हीच वेळ आहे .


आता माझ्या मित्र यादीत अदमासे 1400  मित्र आहेत . 


प्रत्येक जण वेगवेगळ्या सोसायटीत राहतो . 


म्हणजे 1400 सोसायटीच्या छतावर पडणारे पाणी याचा विचार करुया. 


प्रत्येक सोसायटीच्या छतावरचे अदमासे २ लाख लिटर पाणी जर जमिनीत मुरवले तर ८० कोटी लिटर पाणी जमिनीत मुरेल . 


माझ्या चौदाशे मित्रांच्या  मित्रयादीत प्रत्येकी १०० मित्र जरी पकडले तर हा आकडा किती वर जाईल .


प्रत्येक सोसायटीला rain water harvesting चा खर्च अदमासे ६००० ( जास्तीत जास्त ) यापलिकडे जात नाही .


म्हणजे एक लिटर पाणी जमिनीत मुरवायचा खर्च फक्त 3 पैसे ईतका येतो . 


हेच एक लिटर पाणी तुम्ही विकत घेता तेंव्हा मात्र २० रु लिटर या दराने घेता . 


आपण सर्वानी हा संकल्प सोडला तर काही हजार कोटी लिटर पाणी जमिनीला परत देवू शकतो . 


सलग दोन तीन वर्षे हे पाणी जमिनीत परत गेल तर पुन्हा एकदा तुमच्या विहिरीला बोअर ला मुबलक पाणी असेल . 


पाणी कपातीची वेळच येणार नाही .


कसही करा पण यावर्षी पासून ही पाण्याची उधारी परत करायला सुरुवात करुयात .


सगळ्या गोष्टी सरकार करणार नाही .


खरतर ही उधारी तुम्ही वैयक्तिक केलीय तेंव्हा ही उधारी फेडण ही तुमची वैयक्तिक जबाबदारी आहे .


चला या कर्जातून  मोकळे व्हा .


ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc