सोमवार, २० ऑगस्ट, २०१८

. *अप्रतिम संदेश* पावसात एक घटना घडली. झाडावरचं एक घरटं वा-याने अचानक पडलं. दोघं जणं शब्दं संपल्यासारखे बसून होते. *चिमणा* - "सकाळी बोलूयात" *चिमणी* - "हो" रात्रं संपायची वाट बघत दोघं बसून राहिले. सकाळी स्वच्छ प्रकाश पडला.चिमणा उत्साहानी म्हणाला, "निघूया? पुन्हा नव्या काड्या आणू. "तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिमणा - "अग वेडे, *पाडणं* त्याच्या हातात आहे तर *बांधणं* आपल्या हातात आहे आणि मदतीची वाट बघायला आपण *माणसं* थोडीच आहोत!चल निघूया" आणि त्यांनी उंच आकाशात झेप घेतली...यालाच म्हणतात *जगणं*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc