मंगळवार, २३ जुलै, २०१९
लहान असताना एक बरं होतं…
कुणाच्या घरी गेलो तर तिथली माणसे म्हणायची,
“अगं बाई… किती शहाणं बाळ आहे! कसं शांत बसलंय…”
मग आमची आई म्हणायची,
“अहो नाही हो. फार खोडकर आहे हा. चार दिवस तुमच्याकडे ठेऊन घ्या मग कळेल.”
काल बायकोसोबत तिच्या मैत्रिणीच्या घरी गेलो होतो. दोघींच्या गप्पा सुरु असताना हिची मैत्रीण म्हणाली,
“भाऊजी खूप शांत आहेत गं.”
मी लगेच कान टवकारले… पण छे!
बायको आपली “हं” एवढंच म्हणून परत गप्पा मारण्यात व्यस्त झाली…
चार दिवस ठेऊन घे म्हणायला काय झालं होतं? 😡😡😡
#असं_कुठं_असतंय_व्हय? 😭
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
।।श्री राम।। जन्मो जन्मी ऐसा सद्गुरु मिळावा। ब्रह्मचैतन्य हाचि सद्गुरु लाभावा।।१।। राम नामाचा झरा हृदयी प्रकटावा। सद्गुरुच्या छा...
-
आजच्या काळात ... एक पेशेन्ट सापडला रे सापडला की , डॉक्टर , कन्सल्टन्ट , स्पेशालिस्ट , पथॉलॉजिलॅब , रेडीओलॉजिस्ट , केमिस्...
-
एका वाड्यात एक जोशी नावाचे नवे जोडपे आले, जोशी ऑफिसला निघताना जोशी वहिनी रोज म्हणायच्या - *"अहो ! मोरूचा पापा घेतला ना ?* सुर...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा