शनिवार, २७ ऑगस्ट, २०१६

८५ वर्षाचे दिनकर आजोबा रात्री फोनवर बोलता बोलता त्यांना आवडणार्या ८० वर्षाच्या सुलोचना (आजीला) मागणी घालतात..

८५ वर्षाचे दिनकर आजोबा रात्री फोनवर बोलता बोलता त्यांना आवडणार्या ८० वर्षाच्या सुलोचना (आजीला) मागणी घालतात..


पण सकाळी त्यांना आठवत की त्यांची ती "सुलू" त्यांना हो बोलली की नाही ते..


म्हणून ते त्याची शहानिशा करायला त्यांना(आजीना) फोन करतात 

दिनकर आजोबा: "सुलोचने दिनू बोलतोय.."

सुलोचना आजी : "अय्या तुम्ही इतक्या सकाळी सकाळी"


दिनकर आजोबा: "हो ग, मला तुला एक गोष्ट विचारायची होती.."

सुलोचना आजी : "विचारा न........"


दिनकर आजोबा: "मी काल तुला मागणी घातली होती, पण तू हो बोलीस की नाही ते मला आठवत नाही" 

सुलोचना आजी : "मी तर "होच" बोललेली, पण तुम्हाला की कुणाला ते मला आठवत नाही"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

https://youtu.be/MAPFr8eeRGc